मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना 2024 Mukhyamantri Tirtha darshan yojna 2024 मिळवा ३००००अनुदान

Mukhyamantri Tirtha darshan yojna 2024 मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना महाराष्ट्राला संताची व देवी देवतांची भूमी मानली जाते. भारतात विविध धर्मांचे व पंथाचे अनुयायी वास्तव्य करत आहे. महाराष्ट्र खूप सारे संत महंत व धर्म गुरु झालेले आहेत. भारतामधील पावन भूमी म्हणून महाराष्ट्राचे घेतले जाते. महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची तसेच भक्ती मार्गाची एक खूप जुनी परंपरा असून यामध्ये लाखो लोक धर्मकार्य, समाजकार्य भक्ती मार्गाने करत असतात. सर्व नागरिक आपले दैनंदिन कार्य कार्य कर्तव्य पार पडत असताना देखील आपल्या देवाचे भजन व नामस्मरण करत आपले जीवन जगात आहे.

देशात हिंदू धर्मामध्ये चारधाम यात्रा, वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा, महाराष्ट्रातील पंढरपूर यात्रा, तुळजाभवानी यात्रा, जेजुरी यात्रा व इतर धर्माचे मोठ मोठी तीर्थस्थळे आहे तेथे तेथे दर्शनासाठी आयुष्यात एकदातरी जाण्याचे जेष्ठ नागरिकांची इच्छा असते. परंतु गोरगरीब, सर्वसामान्य व जेष्ठ माणसांना त्यांच्या आर्थिक परिस्थिती व सोबत कुणी नसल्यामुळे व तेथील पूर्ण माहिती नसल्या कारणामुळे त्या तीर्थ शाळांना जाने व दर्शन करण्याचे स्वप्न हे तसेच राहून जाते.

हीच बाब लक्ष्यात आल्याने या नागरिकांना देशातील तसेच आपल्या महाराष्ट्रातील तीर्थ स्थळांची दर्शन मनः शांती गाठे सोयीचे व्हावे यासाठी महाराष्ट्रातील सर्व सामान्य सर्व धर्मांच्या नागरिकांना जे ६० वर्षे किंवा त्या पेक्ष्या जास्त वयाचे आहे त्यांना भारतातील तीर्थ क्षेत्राला मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना सुरू करण्यात आली आहे.

Mukhyamantri Tirtha darshan yojna 2024

Mukhyamantri Tirtha darshan yojna
Mukhyamantri Tirtha darshan yojna

येथे नोंदणी करा

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे उद्दिष्टे :

महाराष्ट्रातील सर्व धर्मातील वायोवृद्ध व जेष्ठ नागरिक ज्यांची वय ६० वर्षे व त्यापेक्ष्य अधिक आहे अस्य नागरिकांना महाराष्ट्रातील व भारतातील तीर्थ दर्शन घडवून मनः शांती प्रदान करणे हे आहे.mukhyamantri tirth yatra yojana

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनापात्रता :

(१ ) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी नागरिक हा महाराष्ट्राचा रहिवाशी असावा.

(२ ) वय वर्षे ६० व त्यापेक्ष्य अधिक असणारे जेष्ठ नागरिक.

(३ ) लाभ घेणार्या नागरिकांचे वार्षिक उत्पन्न रु २.५० लाख पेक्ष्या जास्त नसावे.

(४ ) कंत्राटी कामगार, स्वयंसेवी कामगार, बाह्य यांत्रानाद्वारे काम करणारे कर्मचारी पात्र राहतील.mukhyamantri tirth yatra yojana

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अपात्रता

(१) लाभार्थी हा आयकर दाता नसावा.

(२) लाभार्थी कुटुंबातील सदस्य हा कायम कर्मचारी / भारत किंवा राज्य सरकारच्या स्थानिक संस्थेत काम करणारा नसावा. निवृत्ती वेतन घेत असलेले आहे व्यक्ती पत्र ठरणार नाहीत.

(३) ज्या कुटुंबातील सदस्य हा विध्यामान किंवा माजी खासदार, आमदार नासवा.

(४) ज्या कुटुंबातील काही सदस्य हे केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्या बोर्ड/कॉर्पोरेशन याचे अध्याक्ष्य /उपाध्याक्ष्य किंवा सदस्य नसावा.

(५) ज्याच्याकडे चारचाकी वाहने (ट्रक्टर सोडून ) कुटुंबातील सदस्याच्या नावे नोंदणी नसावी.

(६) प्रवसासाठी शारीरिक व मानसिकदृष्ट्या साक्ष्यम असावा. आजारी, संसर्गजन्य रोग, मानसिक आजार नसावा.

(७) जेष्ठ नागरिकाला सरकारी वैध्याकीय अधिकारी यांनी आरोग्य तपासणी केल्यास टी व्यक्ती निरोही आणि प्रवासासाठी साक्ष्यम असल्याचे प्रमानपत्र सादर करावे लागेल. ( हे प्रमाणपत्र १५ दिवसंपेक्ष्या जास्त जुने नसावे.)

(८) जे अर्जदार मागील लोटरीत निवडले परंतु आमंत्रित करून त्यांनी प्रवास पूर्ण केला नाही अश्यांना देखील या योजनेत अपात्र ठरविले जनार नाही.

(९) अर्जदार प्रवाशी यांनी खोटी माहिती देऊन अर्ज केला आहे त्या प्रवास्यांना प्रवासासाठी अपात्र ठरून त्यापुढे कायमचे वंचित ठेवले जाईल.

(१०) मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना यात पात्रता व अपात्रत निकष सुधारण्यासाठी काही आवश्यकता असली तर तीसहासात मान्यतेने केली जाईल.mukhyamantri tirth yatra yojana

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना अर्ज प्रक्रिया

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना online अर्ज सादर करावा लागेल.

लाभार्थ्याकडे स्वतः चे आधार कार्ड व रेशन कार्ड असावे लागेल.

महाराष्ट्रातील रहिवाशी म्हणून लाभार्थ्याकडे अधिवास प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्यातील जन्म दाखला आसवा.

(जर अधिवास प्रमाणपत्र नसेल तर लाभार्थ्याकडे त्याऐवजी १५ वर्षे जुनी रेशन कार्ड/ मतदार ओळखपत्र/ शाळा सोडल्याचा दाखला/ जन्म दाखला यापैकी ओळखपत्र ग्राह्या धरले जातील.)

साक्ष्यम अधिकारी यांनी दिलेले कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला ( २.५० लाख पेक्ष्या कमी ) किंवा पिवळे / केशरी रेशन कार्ड. Mukhyamantri Tirtha darshan yojna 2024

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना वैध्याकीय प्रमाणपत्र

पासपोर्ट आकाराचे फोटो

कुटुंबातील सदस्य यांचा मोबाईल क्रमांक

या योजनेच्या आटी व शर्ती मान्य असल्याबाबतचे हमीपत्र. Mukhyamantri Tirtha darshan yojna 2024

लाभार्थ्याची निवड :

प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी जील्ह्याप्रमाणे कोठा निश्चित केला जाईल.कोठ्यापेक्ष्य अधिक अर्ज प्राप्त झाल्यास संगणकीय प्रणालीद्वारे लॉटरी पद्धतीने प्रवाश्यांची निवड केली जाईल. कोठ्यामध्ये १०० टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्ष्य यादी तयार केली जाईल.

निवड केलेल्या लाभार्थ्यापैकी जर कुणी प्रवास न गेल्यास, प्रतीक्ष्य यादीतील प्रवासास पाठवता येयील.

निवडलेल्या प्रवासी आणि प्रतीक्ष्य यादी विभागाच्या पोर्टल वर, जिल्हाधिकारी कार्यालयावर, समाजकल्याण यांच्या सूचना फलक यावर आणि योग्य वाटेल त्या समाज माध्यमावर प्रसारित केली जाईल.

फक्त निवड झालेली व्यक्तीच यात्रेसाठी जाऊ शकेल त्या सोबत अजून कोणीही कुटुंबातील इतर सदस्य जाऊ शकणार नाही.

जर पाटी पत्नी यांनी स्वतान्त्रापे अर्ज केला असेल आणि त्यापैकी एंकाचाच अर्ज मंजूर असेल त्यावेळेस आयुक्त, समाजकल्याण आयुक्त, पुणे त्यांना किंवा तिला यात्रेला पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील.Mukhyamantri Tirtha darshan yojna 2024

प्रवास प्रक्रिया :

जिल्हा स्थरीय समितीने निवडलेल्या नागरीकांची यादी आयुक्त व समाजकल्याण आयुक्त यांच्याकडे दिली जाईल.

निवडलेल्या जेष्ठ नागरिकांची यादी निवडलेल्या अधिकृत टूरिस्ट कंपनी किंवा संबंधित एजेनशी यांना दिली जाईल

यात्रे दरम्यान परवाशी यांना कोणत्या सोयी सुविधा देण्यात याव्यात याचा निर्णय महाराष्ट्र सरकार यांच्याकाधू घेण्यात येयील.

सर्व यात्रेकरू यांना यात्रा सुरु होण्याच्या निश्चित स्थळी स्वखर्चाने पोहचावे लागेल.

कोणत्याही यात्रेकरूला प्रवासादरम्यान देवस्थान व विभागाने ठरवून दिलेल्या सुविधा व्यतिरिक्त जर काही खर्च किंवा काही अधिक सुविधा पाहिजे असल्यास तो आर्थिक भार स्वतः प्रवासी यांना करावा लागेल.Mukhyamantri Tirtha darshan yojna 2024

प्रवासादरम्यान प्रवासी यांच्याकाडून अपेक्ष्या

प्रवास्यान कोणतेही ज्वलनशील पदार्थ कोणत्याही स्वरुपात नेण्यास प्रतिबंध राहील.

राज्याची व देशाची प्रतिमा खराब होणार नाही कोनतेही कृत्य करू नये व यातेकरूने यात्रेच्या प्रतिष्ठेनुसार वागावे.

प्रवासी त्यांच्या संपर्क अधिकारी यांच्या सूचनेचे पालन करतील.

यात्रा आचारसंहिता पालन करण्यासाठी प्रवाश्याकडून प्रतिज्ञा पत्र घेतले जाईल.

कोणताही प्रवाशी इतर प्रवाश्यांसाठी गैरसोय होईल असे वर्तन करणार नाही.

साधारणपणे ट्रेनमध्ये बर्थ वर झोपण्याची वेळ रात्री १० ते सकाळी ६ तर गरजेनुसार काही बदल केले जातील

अर्ज करण्याची प्रक्रिया :

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचे अर्ज पोर्टल/मोबईल अप /सेतू सुविधा केंद्र येथे ओंनलाईन पधतीने भरले जातील.

पत्र जेष्ठ नागरिकांना अर्ज भरावा लागेल.

अर्ज भरण्याची सोयीसुविधा या सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध आहे.

अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया ही मोफत असेल.

अर्ज भरण्याच्या ठिकाणी अर्जदार स्वतः उपलब्ध पाहिजे जेणे करून अर्जदाराची kyc करता येयील व त्या अर्जदाराचा फोटो घेता येयील.

अर्जादारसह सहाय्यक प्रवासासाम्बंधित तरतुदी:

७५ वर्षे व त्यावरील अर्जदाराला जीवांसाठी किंवा साय्याकापैकी इकाला त्यांच्याबरोबर नेण्याची परवानगी असेल परंतु अर्जदाराने तसे अर्ज भारत असताना नमूद करावे लागेलव त्यांचा साय्यक किंवा जीवांसाठी त्यंच्या सोबत प्रवास करण्यास इच्छुक असावा.

७५ वर्षे पूर्ण अर्जादारासोबत असणार्या सहायकाचे वय ६० वर्षे पेक्ष्या कमी असेल तरीही प्रवास करू शकेल.

जर अर्जादारचे वय हे ७५ वर्ष्यापेक्ष्य कमी असेल तर सहयाकास प्रवासासाठी परवानगी दिली जाणार नाही.

सहायकाचे किमान वय हे २१ वर्षे ते ५० वर्षे इतके असावे. ज्या सोयीसुविधा अर्जदारास दिल्या जातील त्याच प्रकारच्या सुविधा प्रवास्याच्या सहाय्यकास दिली जातील. अर्जदाराचा सहाय्यक हा शरीराने तंदुरुस्त व निरोगी असाव .

प्रवाशी अर्जदार व सहाय्यकास प्रवासासाम्बंधित सर्व नियमांचे पालन करणे बंधन कारक असेल.

राज्यस्तरीय समितीचे कर्तव्य:

मुख्यमत्री तीर्थ दर्शन योजनेचे देखरेख व सनियंत्रण करावे.

राज्यातील योजनेची होत असलेली अंमलबजावणी या बाबतचा आढाव घेने.

योजनेसाठी आवश्यक तेवढा निधी मागणी करून उपलब्ध करून देणे.

नागरिकांच्या उपयुक्त माहितीचे संकलन करणे व तिचे व्यवस्थित जतन करून ठेवणे.

शासनाने वेळोवेळी दिलेली माहिती तिची अंमलबजावणी करावी.

लेखाशिर्ष

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेसाठी लागणाऱ्या खर्च संबंधित निधी तरतूद करून उपलब्ध करणे व स्वतंत्र लेखाशिर्ष घ्यावा.

महाराष्ट्रातील तीर्थादर्शन योजनेसाठी निवडण्यात आलेली स्थळे

सिद्धिविनायक मंदिर मुंबई

महालक्ष्मि मंदिर मुंबई

चैत्य भूमी दादर मुंबई

माउंट मेरी चर्च (वांद्रे ) मुंबई

मुंबादेवी मंदिर मुंबई

वाळकेश्वर मंदिर मलबार हिल मुंबई

विश्व विपास्यना पगोडा गोराई मुंबई

चर्च ऑफ अवर लेडी ऑफ हेल्थ कवेल मुंबई

सेंट अन्द्र्यू चर्च

गोदिजी पार्श्वत मंदिर मुंबई

नेसेट एलियाहू सिनेगोग फोर्ट मुंबई

शार हरहमीम सिनेगोग मस्जिद भांडार

अग्निमंदिर ठाणे

मयुरेश्वर मंदिर मोरगाव पुणे

चिंतामणी मंदिर थेऊर पुणे

गिरिजात्मज मंदिर लेण्याद्री पुणे

महागणपती मंदिर रांजणगाव पुणे

खंडोबा मंदिर जेजुरी पुणे

संत ज्ञानेश्वर समाधी मंदिर आळंदी पुणे

भीमाशंकर ज्योतीर्लीग मंदिर खेड पुणे

संत तुकाराम महाराज समाधी मंदिर देहू पुणे

संत चोखामेळा समाधी पंढरपूर सोलापूर

संत सावतामाळी समाधी मंदिर अरण माढा सोलापूर

विठ्ठल रुख्मिणी मंदिर पंढरपूर सोलापूर

शिखर शिंगणापूर सातारा

महालक्ष्मि मंदिर कोल्हापूर

ज्योतिबा मंदिर कोल्हापूर

जैन मंदिर कुंभोज कोल्हापूर

रेणुका देवी मंदिर माहूर नांदेड

गुरु गोविंदसिंग समाधी मंदिर नांदेड

खंडोबा मंदिर नांदेड

संत नामदेव महाराज समाधी मंदिर उंब्रज नांदेड

तुळजाभवानी मंदिर तुळजापूर धाराशिव

संत एकनाथ महाराज समाधी मंदिर पैठण छत्रपती संभाजीनगर

घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर वेरूळ छत्रपती संभाजीनगर

जैन स्मारक एलोरा लेणी छत्रपती संभाजीनगर

विघ्नेश्वर मंदिर ओझर नाशिक

संत निवृत्तीनाथ महाराज समाधी मंदिर त्रिंबकेश्वर नाशिक

मुक्तिधाम नाशिक

त्र्यंबकेश्वर महादेव मंदिर नाशिक

सप्तशृंगी देवी मंदिर वणी नाशिक

काळाराम मंदिर नाशिक

जैन मंदिरे मान्गी तुंगी नाशिक

गाज पंथ नाशिक

साईबाबा समाधी मंदिर शिर्डी अहमदनगर

सिद्धीविनायक मंदिर सिद्धटेक अहमदनगर

शनिदेव मंदिर शानिशिन्ग्नापूर अहमदनगर

श्री क्षेत्रं भगवान गड पाथर्डी अहमदनगर

बल्लाळेश्वर मंदिर पाली रायगड

संत गजानन महाराज मंदिर शेगाव बुलढाणा

एकविरा देवी मंदिर कुर्ला पुणे

श्री दत्ता मंदिर औदुंबर सांगली

केदारेश्वर मंदिर बीड

वैजनाथ मंदिर परळी बीड

पावस रत्नागिरी

गणपतीपुळे रत्नागिरी

मार्लेश्वर मंदिर रत्नागिरी

महाकाली देवी मंदिर चंद्रपूर

श्री काळूबाई मंदिर सातारा

रामटेक मंदिर नागपूर

दिक्ष्याभूमी नागपूर

चिंतामणी (कळंब ) यवतमाळ